हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ
प्रस्तावना :-
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात समाविष्ट असणाऱ्या हिंदू खाटीक समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यास दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदरचे महामंडळ ” हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी)” या नावाने संबोधिले जाणार आहे. सदर उपकंपनीचे कामकाज हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल. हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) ची रचना, कार्य, राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे :-
1. उपकंपनीची रचना (राज्यस्तर / जिल्हास्तर)
उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे मुख्यालयाच्या ठिकाणी राहील.
उपकंपनीचे संचालक मंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व तीन शासकीय सदस्य राहतील :-
1. | शासन नियुक्त पदाधिकारी
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे अध्यक्ष |
अध्यक्ष |
2. | शासन नियुक्त पदाधिकारी
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष |
उपाध्यक्ष |
3. | मा. अपर मुख्य सचिव /मा.प्रधान सचिव/ मा.सचिव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई |
संचालक |
4. | मा. सहसचिव /मा.उपसचिव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई |
संचालक |
5. | व्यवस्थापकीय संचालक
महत्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., मुंबई |
संचालक तथा
व्यवस्थापकीय संचालक |
6. | अशासकीय सदस्य – 3 | संचालक |
2. उपकंपनीचे कार्य:
1. राज्यातील हिंदू खाटीक समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
2. खाटीक समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे.
3. खाटीक समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
4. खाटीक समाजासाठी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
5. राज्यातील हिंदू खाटीक समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहवाल तयार करणे.
- सद्य:स्थितीत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या सर्व योजना हिंदू खाटीक समाजासाठी प्रस्तुत उपकंपनीमार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येतील.
- सन 2024-25 या आर्थिक वर्षात हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनी करिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या भागभांडवली लेखाशिर्ष (4225-0031) मधून आवश्यक तरतूद मंजूर करण्यात येईल. उपकंपनीकरिता आवश्यक पदनिर्मिती (आकृतीबंध) व आर्थिक तरतूद याबाबत विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. तसेच मुख्य कंपनीच्या आस्थापनेवरील पदाच्या कार्यभार व निकषानुसार उपकंपनीतील मंजूर पदाकरिता कार्यभार व निकष लागू राहतील.
- हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे सध्याच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या मुख्यालयांतर्गत राहील.
जिल्हा स्तरावरील कामकाजासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांच्या जिल्हा कार्यालयातील मंजूर अधिकारी/कर्मचाऱ्यांकडूनच उपकंपनीचे कामकाज करण्यात येईल. - सद्य:स्थितीत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक हे या उपकंपनीचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.
- सद्य:स्थितीत हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे राहील.