विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

मागासवर्गीयांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या योजना प्रभावीपणे व परिणामकारकरित्या अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शासन निर्णय सकआ-2001/ प्रक्र.35/ आस्था-2, दिनांक 12 मार्च 2001 अन्वये समाज कल्याण संचालनालयाचे विभाजन करुन स्वतंत्र विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची स्थापना करण्यात आली. दि. 6.7.2001 पासून संचालनालयाच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली.

 • संचालनालयामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी शासनाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनांची अंमलबजावणी.
 • संचालनालयाचे मुख्यालय पुणे येथे असून जिल्हा व प्रादेशिक स्तरावर आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत योजनांची अंमजबजावणी करण्यात येते.
 • या संचालनालयासाठी संचालनालय स्तरावर 53 आणि जिल्हास्तरावर 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत.
 • विमुक्त जातीमध्ये एकूण 14 जातींचा समावेश आहे.

  -- भटक्या जातींमध्ये मूळ 28 तर 25.5.1990 च्या शासन निर्णयान्वये धनगर व तत्सम तसेच दि.23.3.1994 च्या शासन निर्णयान्वये वंजारी, तत्सम इ. एकूण 37 जातींचा समावेश करण्यात आला आहे.
 • इतर मागासवर्गीय जातींमध्ये एकूण 350 जातींचा समावेश आहे.
 • विशेष मागास प्रवर्गामध्ये गोवारी, गवारीसह एकूण 07 जाती-जमातींचा समावेश आहे.

आरक्षण तपशिल खालीलप्रमाणे.

आरक्षण तपशिल खालीलप्रमाणे.
प्रवर्ग जातींची संख्या आरक्षण टक्केवारी
विमुक्त जाती अ 14 3%
भटक्या जमाती ब 37 2.5%
भटक्या जमाती क 1 3.5%
भटक्या जमाती ड 1 2%
विशेष मागास प्रवर्ग 7 2%
इतर मागासवर्ग 350 19%

लोकसंख्या

सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 1123.73 लक्ष
इमाव ची अंदाजित लोकसंख्या (विजाभज, विमाप्र सह) 368.83 लक्ष
एकूण लोकसंख्येशी इमावचे प्रमाण : 32.82%

विजाभज अंदाजित लोकसंख्या

1960 थाडे समितीच्या अंदाजानुसार 11.95 लक्ष
1991 डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थेचा अंदाज 65.73 लक्ष
2001 आश्रमशाळेच्या शिक्षकाकडून मिळविलेले अंदाज 71.12 लक्ष
2011 वार्षिक 1.6 टक्के वाढीचा दर लक्षात घेऊन केलेला अंदाज 82.67 लक्ष

आयुक्त

विजाभज विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव विजाभज विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना.
3 योजनेचा उद्देश. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना शासननिर्णय क्र.ईबीसी/1068/83567/जे दि.24.12.1970 अन्वये सन 1970 पासून लागू केलेली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू

आहे त्याचे नाव
विमुक्त जाती/ भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • पालकाचे गतवर्षीचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखा पर्यंत असावे.
 • पूर्णवेळ नोकरी करणारा उमेदवार योजनेच्या लाभास पात्र नाही.
 • त्याच इयत्तेत पुन:प्रवेशित विद्यार्थी लाभास पात्र नाही, तथापि उत्तीर्ण होवून पुढील इयत्तेत गेल्यानंतर त्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय होईल.
 • एका पालकाचे दोन विद्यार्थी (मुली वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
 • इतर शिष्यवृत्तीचा लाभ स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप वसतिगृहात न राहणा-या पात्र विद्यार्थ्यांस दरमहा रु.90/- ते 190/- एवढी व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांस दरमहा रु.150/- ते 425/- एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in

या वेबसाईटवर विजाभज विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव 1. संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

2. संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 26534.32 182770
2 2013-14 45596.77 231556
3 2014-15 47981.97 143342

इ.मा.व. विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती .

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती .
2 योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना.
3 योजनेचा उद्देश. इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने अनुसूचित जातीच्या केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना शासन निर्णय क्र.इमाव-2002/प्रक्र.414/मावक-3, दि.29.5.2003 अन्वये सन 2003-04 पासून शासकीय व शासन मान्य खाजगी अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. तदनंतर सदरची योजना शासन निर्णय दि.31.3.2004 नुसार सन 2003-04 पासूनच विना अनुदानित महाविद्यालयांतील इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सुध्दा लागू करण्यात आली.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव इतर मागासवर्ग .

 
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखा पर्यंत असावे.
 • पूर्णवेळ नोकरी करणारा उमेदवार योजनेच्या लाभास पात्र नाही.
 • त्याच इयत्तेत पुन:प्रवेशित विद्यार्थी लाभास पात्र नाही, तथापि उत्तीर्ण होवून पुढील इयत्तेत गेल्यानंतर त्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय होईल.
 • एका पालकाचे दोन विद्यार्थी (मुली वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
 • इतर शिष्यवृत्तीचा लाभ स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • वसतिगृहात न राहणा-या पात्र विद्यार्थ्यांस दरमहा रु.90/- ते 190/- एवढी व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांस दरमहा रु.150/- ते 425/- एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
 • सदर योजनांतर्गत शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परिक्षा फी ची 50% प्रतिपूर्ती राज्य शासनातर्फे केली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in

या वेबसाईटवर इ.मा.व. विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 54320.74 507377
2 2013-14 78355.67 659781
3 2014-15 87121.83 606339

विमाप्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सवलती .

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
2.3 योजनेचे नाव विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सवलती .
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना.
3 योजनेचा उद्देश. विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना शासननिर्णय क्र.ईबीसी-1095/प्र.क्र.91/मावक-2, दि.29.10.1996 अन्वये सन 1995-96 पासून लागू केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत 100% शिष्यवृत्तीची तरतूद उपलब्ध करुन दिली जाते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • पालकाचे गतवर्षीचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखा पर्यंत असावे.
 • पूर्णवेळ नोकरी करणारा उमेदवार योजनेच्या लाभास पात्र नाही.
 • त्याच इयत्तेत पुन:प्रवेशित विद्यार्थी लाभास पात्र नाही, तथापि उत्तीर्ण होवून पुढील इयत्तेत गेल्यानंतर त्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय होईल.
 • एका पालकाचे दोन विद्यार्थी (मुली वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
 • इतर शिष्यवृत्तीचा लाभ स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • वसतिगृहात न राहणा-या पात्र विद्यार्थ्यांस दरमहा रु.90/- ते 190/- एवढी व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांस दरमहा रु.150/- ते 425/- एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
 • तसेच पालकाचे उत्पन्न रु. 1.00 लाखापेक्षा जास्त व रु. 4.50 लाखाच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची (Freeship) प्रतिपूर्ती करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in

या वेबसाईटवर वि.मा.प्र. विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 7973.44 29634
2 2013-14 13738.89 54255
3 2014-15 17646.93 39313

शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने (विजाभज)

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना.
3 योजनेचा उद्देश. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शालांत परिक्षोत्तर शिक्षण फी व परिक्षा फी देण्याची योजना शासननिर्णय क्र.ईबीसी/1068/83567/जे, दि.24.12.1970 अन्वये सन 1970 पासून शासकीय व शासन मान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती/ भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी 1) विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणारा असावा.

2) पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाख ते रु.4.50 लाख पर्यंत.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप शासकीय व शासन मान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामध्ये शिकणा-या इतर अभ्यासक्रमासाठी शासकीय दराने व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शासकीय कोटयातून प्रवेश घेतलेल्या विमाप्र विद्यार्थ्यांना शासन निर्णय दि.12.3.2007 अन्वये सन 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क समितीने निश्चित केलेल्या दराच्या 100% दराने शैक्षणिक फी व परीक्षा फीची प्रतिपूर्ती करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव 1.संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

2.संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 7540.19 19718
2 2013-14 17283.39 37510
3 2014-15 15720.27 15925

शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने (इमाव )

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना.
3 योजनेचा उद्देश. इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शालांत परिक्षोत्तर शिक्षण फी व परिक्षा फी देण्याची योजना शासन निर्णय क्र.इमाव-2003/प्रक्र.203/मावक-3, दि.6.10.2003 अन्वये सन 2003-04 पासून शासकीय व शासन मान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
इतर मागासवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणारा असावा.
 • पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाख ते रु.4.50 लाख पर्यंत असावे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप शासकिय व अनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना 100% दराने तसेच शासन मान्य विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क समितीने निश्चित केलेल्या शिक्षण शुल्क दराच्या 50% दराने शिक्षण फी ची प्रतिपूर्ती करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फी अदा करणे या योजनेचा अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव 1.संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

2.संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 19472.04 113285
2 2013-14 17295.00 83117
3 2014-15 12062.42 39701

इयत्ता 10 वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र वर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला- मुलींचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने शासन निर्णय क्र. इमाव 2003/प्र.क्र.204/मावक-3, दिनांक 25 जुलै 2003 अन्वये सदरची योजना शैक्षणिक वर्ष 2003-04 पासून सुरु करण्यांत आली.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी 1. विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा. 2. विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. 3. सदरील शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची अट नाही. 4.विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के व त्या पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. 5. ही शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त असेल.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रति विद्यार्थी प्रतिमहा रुपये 300/- या प्रमाणे 10 महिन्यांकरीता एकूण रु. 3000/- चा लाभ इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती म्हणून देण्यांत येतेा.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in यावेबसाईटवर लाभार्थ्यांनी इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 646.94 21770
2 2013-14 799.48 20552
3 2014-15 636.46 12028

इ.8वी ते 10 वी मध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना .

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इ.8वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना .
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना.
3 योजनेचा उद्देश. माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय क्र.इमाव-2003/प्र.क्र.201/मावक-3, दि.25.7.2003 अन्वये सन 2003-04 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केलेली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थीनी ही विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी.
 • विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला असावा व ती इ. 8 वी ते 10 वी पर्यंत वर्गात नियमित शिकत असावी.
 • उत्पन्नाची अट नाही.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप इ.8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या सदर प्रवर्गातील विद्यार्थीनींना दरमहा रु.100 /- या प्रमाणे 10 महिन्यांसाठी रु. 1000/- एवढी शिष्यवृत्ती संबंधित शाळेमार्फत त्यांचे उत्पन्न व गुणांची अट लक्षात न घेता देण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावून इ.8वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या पात्र विद्यार्थिनींचे अर्ज भरुन संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित शाळा.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 2285.16 222694
2 2013-14 2080.95 208095
3 2014-15 1455.36 145536

योजनेचे नाव व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहांतील विद्यार्थ्याना विद्यावेतन तसेच व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहाच्या व शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहाच्या व शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीव्दारे मिळणाऱ्या निर्वाह भत्यामधून व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके, भोजन, निवास, स्टेशनरी इत्यादी बाबींचा खर्च भागत नाही, म्हणून राज्य सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व्यतिरिक्त विद्यावेतन देण्याचा शासनाने शासन निर्णय क्र.इमाव-2003/ प्रक्र-202/मावक-3, दि.18/7/2003 अन्वये निर्णय घेतलेला आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी (अ) (1) विद्यार्थी व्यावसायिक पाठयक्रमासाठी प्रवेशित असावा. (2) राज्य सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती धारक असावा. (3) पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाख पेक्षा कमी असावे. (4) विद्यार्थ्याने शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा. (5) व्यावसायिक पाठयक्रम महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामध्ये प्रवेशित असावा, किंवा त्या वसतिगृहात प्रवेशास जागा उपलब्ध नाही असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. (6) स्थानिक किंवा स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही. (ब) जे विद्यार्थी वसतिगृहा बाहेर राहत आहेत अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहात तसेच तेथील शासकीय वसतिगृहात अर्ज करुन व पात्र असूनही प्रवेश मिळाला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
दिल्या जाणाऱ्या

लाभाचे स्वरुप

अभ्यासक्रमाचा प्रकार आणि कालावधी

वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी विद्यावेतन

(10 महिन्यासाठी)

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी विद्यावेतन (10 महिन्यासाठी)

4 ते 5 वर्षाचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुशास्त्र, इ. अभ्यासक्रम 7000/- 10000/-
2 ते 3 वर्षाचे अभियांत्रिकी, पदविका, पदवी, एमबीए, एमएसडब्ल्यू इ. 5000/- 7000/-
2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम. उदा : बीएड डीएड इ. 5000/- 5000/-
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 442.74 7162
2 2013-14 465.46 6870
3 2014-15 473.75 3769

सैनिकी शाळेत प्रशिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव सैनिकी शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश.

 
सैनिकी शाळेत शिक्षण घेणां-या विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णय क्र.इबीसी-1074/564/का-5, दि. 6 ऑगस्ट 1976 अन्वये सदरील योजना लागू करण्यांत आली आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णय क्र.संकिर्ण-2002/प्र.क्र.371/मावक-3, दि.5 ऑगस्ट, 2003 अन्वये सदरील योजना विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2003-2004 पासून लागू केलेली आहे. शासन निर्णय क्र. इबीसी-2003/प्र.क्र.184/मावक-2, दि.17/9/2003 अन्वये रु.15000/- वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सैनिकी शाळेत शिक्षण घेणां-या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश घेण्यांसाठी प्रोत्साहन मिळणेसाठी ही योजना सुरु करण्यांत आली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी 1. विद्यार्थी हा शासन मान्यता प्राप्त सैनिकी शाळेत शिकत असावा. 2. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1.00 लाखा पर्यंत असावे. 3.विद्यार्थी विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप सातारा सैनिक शाळा, भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक व एसएसपीएमएस सैनिक शाळा, पुणे या 3 शाळातील विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना भोजन, कपडे, निवास शिक्षण फी व परिक्षा फी, क्रीडा, घोडेस्वार व पॉकेट मनीसाठी संपूर्ण खर्च शासन देते. या व्यतिरिक्तच्या राज्य शासन मान्यता प्राप्त सैनिकी शाळेतील प्रवेशितास प्रति विद्यार्थी वार्षिक रुपये 15000/- पर्यंत निर्वाह भत्याची रक्कम संबधीत सैनिकी शाळेस अदा केली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सैनिकी शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज / माहिती भरुन कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
 • संबधित शाळा/ महाविद्यालयाचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 317.19 2052
2 2013-14 310.33 1623
3 2014-15 251.74 2588

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण).

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण).
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश.

 
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील बेरोजगार/अल्पशिक्षीत उमेदवारांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधांचा व साधन सामुग्रीचा यथायोग्य वापर करुन अल्प कालावधीचे प्रशिक्षण देऊन या प्रशिक्षीत उमेदवारांना स्वयंरोजगार मिळावा, या हेतूने शासन निर्णय क्र. इमाव 2003/प्रक्र-208/ मावक-3, दि.25.7.2003 अन्वये सन 2003-04 पासून सदरहू योजना लागू केलेली आहे.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी टुल्सचा एक संच किंमत रु.1000/- च्या मर्यादेत देण्यात येतो. ही योजना संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी हा विजाभज/विमाप्र या प्रवर्गाचा असावा.
 • प्रशिक्षणार्थ्यांची निवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेमार्फत करण्यात येते.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

प्रशिक्षण खर्चासाठी प्रती विद्यार्थी प्रति अभ्यासक्रमास, प्रशिक्षणाच्या

कालावधी नुसार रु.400/- ते रु.2400/- पर्यंत प्रशिक्षण शुल्क दिले

जाते तसेच प्रतिमहा रु.100/- विद्यावेतन दिले जाते व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी रु.1000/- एवढया किंमतीचा टूल्स किट दिला जातो.

7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई या कार्यालयास सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
 • संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 23.09 924
2 2013-14 0.00 00
3 2014-15 0.45 00

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज/विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. सदरची योजना शासन निर्णय क्र.ईबीसी-1079/56243/डी-1, दि.07.05.1983 अन्वये लागू करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे कल वाढण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. तांत्रिक शिक्षण विभागांकडून प्रतिमहा रु.40/- व या विभागामार्फत प्रतिमहा रु.60/- याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ज्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मंडळांकडून विद्यावेतन दिले जात नाही. त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु.100/- याप्रमाणे या विभागांकडून विद्यावेतन दिले जाते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र या प्रवर्गाचा असावा.
 • विद्यार्थ्यांने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
 • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.65,290/-पर्यंत असावे.
 • प्रशिक्षणार्थ्यांची निवड संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य करतात.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रति विद्यार्थी प्रतिमाह रु.100/- या प्रमाणे विद्यावेतन दिले जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 17.50 4639
2 2013-14 18.50 3921
3 2014-15 18.65 2498

माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करणे.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी व अन्य फी प्रदान करणे.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. शासन निर्णय क्र. इबीसी/1068/83567/जे, दिनांक 24 डिसेंबर, 1970 अन्वये ही योजना विजाभज प्रवर्गाकरीता लागू करण्यांत आली असून शासन निर्णय क्र. इबीसी/1094/प्र.क्र.91/मावक-2, दिनांक 29 ऑक्टोंबर, 1996 अन्वये विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा योजना लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क ,परिक्षा शुल्क, वाचनालय फी, प्रयोगशाळा व क्रिडांगण फी प्रदान करण्यात येते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी हा मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेत असलेला असावा.
 • विद्यार्थ्याचे वय व उत्पन्नाची अट नाही.
 • विद्यार्थी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावा.
 • एक वेळ नापास झालेल्या विद्यार्थ्याला देखील सदरहू योजनाचा लाभ देता येतो.
 • त्याच वर्गात दोन वेळा नापास झालेल्यांना सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • शासन मान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेमधील इयत्ता 1ली ते 10वी मधील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरी/ग्रामीण क्षेत्रानुसार द.म. रु.100/- ते 200/- या दराप्रमाणे शिक्षण फी ची प्रतिपूर्ती केली जाते.
 • शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, वाचनालय फी, प्रयोगशाळा फी दिली जाते.
 • इतर कोणतीही शैक्षणिक सवलत / लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
7 अर्ज करण्याची पध्दत
 • संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावेत.
 • बृहन्मुंबई बाबतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
 • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर.
 • संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 91.74 29379
2 2013-14 85.66 32132
3 2014-15 141.62 23953

माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदाने.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट, 1966 अन्वये ही योजना विजाभज विद्यार्थ्यांना लागू करण्यांत आली. शासन निर्णय क्र. इबीसी-1094/प्र.क्र. 109/मावक-2, दि.17-8-1995 अन्वये ही योजना सुधारीत केली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 अन्वये ही योजना विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. माध्यमिक शाळेतील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरु करण्यांत आली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावा.
 • विद्यार्थी इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकणारा असावा.
 • गतवर्षी वार्षिक परिक्षेत विद्यार्थ्यांना 50 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून विद्यार्थी वर्गात प्रथम व द्वित्तीय क्रमाने पास झालेला असावा.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु. 20/- प्रमाणे 10 महिन्यासाठी रु. 200/- व इ. 8वी ते 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु.40/- याप्रमाणे 10 महिन्याकरीता रुपये 400/- शिष्यवृत्ती दिली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत
 • संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावेत.
 • बृहन्मुंबई साठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
 • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
 • संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 75.47 15995
2 2013-14 64.46 13544
3 2014-15 138.92 26137

इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थींनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
 • विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.
 • विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
 • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
 • संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 272.81 45211
2 2013-14 290.14 57463
3 2014-15 1189.04 132690

इयत्ता 10वी व 12 वी च्या परिक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इयत्ता 10वी व 12 वी च्या परिक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त करणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती/ भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीतील असावा.
 • विद्यार्थी राज्यातून / बोर्डातून विजाभज प्रवर्गातून सर्वप्रथम आलेला असावा.
 • राज्यस्तरावर व बोर्डात प्रथम आलेला विजाभज प्रवर्गातील मुलगा व मुलगी दोघांनाही पुरस्कार देण्यात येईल.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
1 विजाभज प्रवर्गातून इयत्ता 10 वी परिक्षेमध्ये

राज्यात प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनी
प्रत्येकी रु.1 लाख रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
2 विजाभज प्रवर्गातून इयत्ता 10 वी परिक्षेमध्ये

विभागीय बोर्डात आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनी
प्रत्येकी रु.51 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
3 विजाभज प्रवर्गातून इयत्ता 12 वी परिक्षेमध्ये

राज्यात प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनी.
प्रत्येकी रु.1 लाख रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
4 विजाभज प्रवर्गातून इयत्ता 12 वी परिक्षेमध्ये

विभागीय बोर्डात आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनी.
प्रत्येकी रु.51 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
7 अर्ज करण्याची पध्दत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त यादी नुसार संचालनालय स्तरावरुन कार्यवाही करण्यात येते.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे.

सांख्यिकी माहिती

सदर योजना सन 2015-16 पासून अंमलात येत आहे. त्यामुळे मागील खर्च निरंक.

विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव

विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा.

2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत, त्यांचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, मुलामुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, तसेच विजाभज मुलामुलींचा शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकास घडावा, यासाठी मोफत निवास, भोजन, शैक्षणिक सुविधा, क्रीडा सुविधा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक साहित्य पुरवून विजाभज विद्यार्थ्यांना स्थिरता देवून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देण्यात येते. सदरची योजना स्वयंसेवी संस्थाना अनुदान देऊन राबविण्यात येते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती / भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • स्वयंसेवी संस्था ही सोसायटी ॲक्ट 1950 व सार्वजनिक विश्वस्त कायदा अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत संस्था असावी.
 • संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिका-यांवर कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा सिध्द होऊन शिक्षा झालेली नसावी.
 • संस्था आश्रमशाळा चालविण्यास आर्थिकदृष्टया सक्षम असावी.
 • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
 • लाभधारक मुलगा / मुलगी हे विजाभज प्रवर्गातील असावे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • 1ली ते 4थी किंवा 1 ली ते 7 वी प्राथमिक शाळा, 5वी ते 10वी किंवा 8 वी ते 10 वी या माध्यमिक शाळा, आणि 11वी ते 12 वी या उच्च माध्यमिक आश्रम शाळा असे हया निवासी शाळांचे स्वरुप आहे.
 • विजाभज, विमाप्र मुलां - मुलींची शाळेत मोफत भोजन व निवास व्यवस्था केली जाते.

प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची भांडी, अंथरुण-पांघरुण, क्रीडा साहित्य, आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात.

 • आश्रमशाळा चालविणा-या संस्थेस शासन मान्यता मिळाल्यानंतर शासन नियमानुसार 100% वेतन तसेच नियमानुसार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेस अनुक्रमे 8% व 12% वेतनेत्तर अनुदान शासनाच्या विहीत अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर अनुज्ञेय होते. तसेच दरमाह प्रति विद्यार्थी रु.900/- प्रमाणे परिरक्षण अनुदान प्राथमिक शाळेसाठी 11 महिने व माध्यमिक शाळेसाठी 10 महिन्यांसाठी अनुज्ञेय होते.
7 अर्ज करण्याची पध्दत शाळेच्या नियमित प्रवेश पध्दतीनुसार.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कलयाण.
 • संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 43657.95 970 शाळा
2 2013-14 54169.26 970 शाळा
3 2014-15 55968.46 970 शाळा

विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालये.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालये.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश.

 
 • माध्यमिक शाळेला जोडून इयत्ता 11 वी व 12 वी चे वर्ग मंजूर करुन मोफत निवास भोजन व शिक्षणाची सुविधा देणे.
 • विजाभज/विमाप्र मुला-मुलींचा शैक्षणिक, सामाजिक तसेच सर्वांगिण विकास घडविण्यासाठी प्रयत्न करणे.
 • महाविद्यालयीन शिक्षणामध्ये विजाभज मुलामुलींमधील शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी करणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती/ भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • संस्थेकडे शासन मान्यता प्राप्त माध्यमिक आश्रमशाळा असावी.
 • संस्थेकडे इमारत, पाण्याची सुविधा व अन्य पायाभूत सोयी उपलब्ध असाव्यात.
 • आजूबाजूच्या परिसरात विजाभजची लोकवस्ती असावी.
 • आजूबाजूच्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या कमी असावी.
 • माध्यमिक आश्रमशाळेचा मागील वर्षाचा निकाल 60% पेक्षा जास्त असावा.
 • संस्थेच्या विरुध्द कोणत्याही तक्रारी/ न्यायालयीन वाद नसावा.
 • संस्था कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यास आर्थिक दृष्टया सक्षम असावी.
 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • लाभधारक मुलगा/मुलगी विजाभज, विमाप्र प्रवर्गातील असणे आवश्यक.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप विजाभज विमाप्र मुला-मुलींची कनिष्ठ महाविद्यालयात मोफत भोजन व निवास व्यवस्था केली जाते.
 • प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व गणवेश भोजनाची भांडी अंथरुण, पाघंरुण मोफत दिले जाते.
 • माध्यमिक आश्रमशाळेस श्रेणी वाढीने कनिष्ठ महाविद्यालयास मान्यता मिळाल्यानंतर व शासनाच्या विहीत अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर वेतन व वेतनेत्तर अनुदान अनुज्ञेय होते.
7 अर्ज करण्याची पध्दत नियमित प्रवेश पध्दतीनुसार.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
 • संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.

विद्यानिकेतन शाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव विद्यानिकेतन शाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. महाराष्ट्रातील विजाभज विद्यार्थ्याना निवासी शिक्षणाचा फायदा मिळावा आणि त्यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी या उदेशाने सन-1953 पासून आश्रमशाळा योजना अंमलात आणली. तथापि विजाभज प्रवर्गातील होतकरु व हुशार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यासाठी शासन निर्णय क्रमांक व्हीएएस/1090/प्र.क्र.135/मावक-6, दिनांक 6/11/1995 अन्वये स्वयंसेवी संस्था मार्फत स्वतंत्र विद्या निकेतन योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. शासन निर्णय दिनांक 31/7/1996 अन्वये विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर कोटग्याळ, ता.मुखेड जि.नांदेड या स्वयंसेवी संस्थेस विद्यानिकेतन सन-1996-97 पासून सुरू करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. सध्या कार्यरत असलेल्या विद्यानिकेतन मध्ये इयता 5वी ते 12 वी पर्यंत वर्ग सुरू असून 640 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती/ भटक्या जमाती.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • लाभार्थी विजाभज जाती जमाती पैंकी असावा.
 • पालकांचे वार्षीक उत्पन्न 24000 पेक्षा जास्त नसावे.
 • सदर विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परिक्षेव्दारे केली जाते.
 • विजाभज संचालनालया मार्फत अनुदानित विजाभज प्राथमिक आश्रमशाळेत इयता 4 थी मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विजाभज विद्यानिकेतनामधील इयत्ता 5वी मध्ये प्रवेश परीक्षेतील गुणवत्ते नुसार प्रवेश दिला जातो.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप शासन निर्णय क्र.विभशा-2011/प्र.क्र.182 / विजाभज-2, दि.16 मे, 2012 नुसार विद्यार्थी भोजनावर दरडोई दरमहा खर्च रु. 1000/- विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके, गणवेश, स्टेशनरी इ. साठी प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी रु.1450/- तसेच विद्यार्थ्यांना आंथरुन पांघरुन, पलंग, दैनंदिन स्वच्छता व दुरुस्ती खर्चासाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी रु. 1000/- इतके अनुदान स्वयंसेवी संस्थेस देण्यात येते. याशिवाय वेतन, वेतनेत्तर अनुदान अनुज्ञेय आहे. याकरीता होणाऱ्या एकूण वार्षिक खर्चाच्या 10% खर्च संस्थेने उचलावयाचा आहे.
7 अर्ज करण्याची पध्दत विजाभज आश्रम शाळेतील इयत्ता ४थी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांचे परिक्षेसाठी अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करावेत.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव १) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सर्व.

२) प्राचार्य, विद्यानिकेतन कमळेवाडी जि.नांदेड.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च विद्यार्थी
1 2012-13 273.34 640
2 2013-14 305.13 640
3 2014-15 316.82 640

उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थाना सहाय्यक अनुदाने

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थाना

सहाय्यक अनुदाने
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. राज्यातील उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये व ते शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना शिक्षण, भेाजन, निवास व्यवस्था एकाच छत्राखाली देणे याकरीता बीड जिल्हयात दोन ठिकाणी परळी वैजनाथ व केज येथे उसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळांना मंजूरी दिलेली आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
उसतोड कामगार पाल्यांसाठी.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • या योजनेअंतर्गत उसतोड कामगारांचा मुलगा/मुलगी असणे आवश्यक आहे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • या योजनेअंतर्गत उसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण, निवास भेाजन व्यवस्था करण्यात येते. त्याचप्रमाणे क्रमिक पुस्तके, वहया, शालेय साहित्य, पलंग, आंथरुन पांघरुन व वैद्यकीय सुविधा देण्यात येतात.
 • या आश्रमशाळा चालविणा-या स्वयंसेवी संस्थेस प्रति विद्यार्थी दरमाह रुपये 900/- प्रमाणे 11 महिन्यासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.
 • मान्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याच्या वेतनावर 100 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच इतर मान्य बाबींसाठी शाळा व वसतिगृहासाठी 8 टक्के आकस्मिक खर्च देण्यात येतो.
 • इमारत भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या दराच्या 75 टक्के एवढे अनुदान स्वरुपात देण्यात येते.

उसतोड कामगारांची संख्या विचारात घेऊन सद्य:स्थितीत या योजनेअंतर्गत केज व परळी जि.बीड येथे प्राथमिक आश्रम शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील मान्य विद्यार्थी संख्या प्रत्येकी 120 इतकी आहे. तसेच सन 2010-11 पासून दोन्ही शाळांना नैसर्गिक श्रेणी वाढीने इ.8वी ते 10वीचे पर्यंतचे वर्ग मंजुर केलेले असून या 3 वर्गाची निवासी विद्यार्थी मान्य संख्या 120 इतकी आहे.

7 अर्ज करण्याची पध्दत नियमित प्रवेश पध्दतीनुसार.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
 • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, र्बीड
 • संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च विद्यार्थी
1 2012-13 105.99 400
2 2013-14 228.79 400
3 2014-15 244.83 480

वसंतराव नाईक तांडा सुधार योजना

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. शासन निर्णय क्रमांक इमाव-2003/प्र.क्र.205/मावक-3, दिनांक-7/6/2003 अन्वये तांडा/वस्ती सुधार योजनेस मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्र. इमाव 2003/प्र.क्र.205/मावक-3, दि. 1/6/2005 च्या शुध्दीपत्रान्वये सदर योजना ही तांडे / वस्ती मुख्य गावाशी जोडण्याकरिता सुधारीत करण्यात आलेली आहे. शासन निर्णय क्र.इमाव/2008/प्र.क्र.180/मावक-3, दि.19/12/08 नुसार सदर योजनेच्या अनुदानाच्या रकमेत खालीलप्रमाणे वाढ करुन कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.
अ. क्र. लोकसंख्या अनुदान रक्कम
1 51-100 4.00 लाख
2 101-150 6.00 लाख
3 151 व त्यापुढे 10.00 लाख

शासन शुद्धीपत्रक क्र. तांसुयो-2011/ प्र.क्र. 10/ विजाभज-1, दि. 2 जानेवारी, 2013 अन्वये तांडा वस्ती सुधार योजना ही विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या सर्व जाती जमातींकरिता लागू करण्यात आलेली आहे.

4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • सन 2001 च्या जनगणनेनुसार तांडा वस्तीची लोकसंख्या विचारात घ्यावी. सदर वस्ती तांडा वस्ती म्हणून घोषित करावी. घोषित कालावधी 5 वर्षे राहील.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक तांडा वस्तीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदानाच्या रकमेस शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार तांडा वस्ती कामांना सदर अनुदान देय आहे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप राज्यातील विजाभज वर्गातील लमाण / बंजारा समाजाच्या तांडा व वस्तीमध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे व सदर सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, गटारे, सेवाभवन (समाजमंदिर), शौचालये, वाचनालये शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची कामे हाती घेण्यात यावीत.
7 अर्ज करण्याची पध्दत ग्रामपंचायतीने ठराव पारीत करुन प्रस्ताव संबंधित पंचायत समितीकडे सादर करावा. पंचायत समितीमार्फत सदरहू प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करण्यात येतो. शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत कामांना मंजुरी प्रदान केली जाते.
8 योजनेची वर्गवारी सामाजिक.
9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 3033.80 559
2 2013-14 2399.78 568
3 2014-15 1573.37 577

वाहन चालक प्रशिक्षण योजना (विजाभज, इमाव व विमाप्र)

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. मोटार वाहन चालक प्रशिक्षण ही योजना शासन निर्णय क्र. इबीसी-1970/121397-जे, दि.7.9.1972 अन्वये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या उमेदवारांना लागू करण्यात आली.

सदर योजनेत सुधारणा करुन शासन निर्णय क्र. संकीर्ण/1095/ प्र.क्र.57/ मावक-2, दि.26/7/1995 व दि.23.7.2009 आणि शासन शुध्दीपत्रक दि.30 जुलै, 2009 नुसार युवक व युवतींना वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देण्याची येाजना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येते. त्याकरिता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन निर्णय दि.27.2.2013 नुसार खालीलप्रमाणे रक्कम अदा केली जाते.
प्रशिक्षण प्रकार प्रशिक्षण दर रु. प्रशिक्षण कालावधी
हलके वाहन 4264/- 40 दिवस
अवजड वाहन 4960/- 40 दिवस
वाहक 1728/- 8 दिवस

तसेच शासन शुध्दीपत्रक दि.15 मार्च, 2012 नुसार लाभार्थ्यांना पोस्टाने चालक/ वाहक परवाना पाठविणेकरीता प्रतिलाभार्थी रु.100/- एवढी रक्कम मंजुर करण्यात येते.

4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

त्याचे नाव
विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग / विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • उमेदवार विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा असावा.
 • उमेदवार हा वाहन प्रशिक्षणासाठी मोटार परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता, इत्यादि बाबींची पूर्तता करणारा आसावा.
 • प्रशिक्षण कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था इत्यादि संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणारा स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात रहात नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस रु.300/- व वाहक प्रशिक्षणार्थ्यास रु.150/- याप्रमाणे प्रशिक्षण काळात विद्यावेतन देणे प्रशिक्षण संस्थेवर बंधनकारक राहील.
7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा.
8 योजनेची वर्गवारी आर्थिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 2260.00 64433
2 2013-14 2369.98 58796
3 2014-15 1263.00 43633

विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.

कार्यालयाचे नांव - विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश.
 • राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे.
 • राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सहाय्य करणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती .
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारे असावे.
 • लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.
 • लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे.
 • लाभार्थी कुटुंब हे झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारे असावे.
 • लाभार्थी कुटूंब हे भूमीहीन असावे.
 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
 • लाभार्थी कुटुंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.
 • लाभार्थी वर्षभरात किमान 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
 • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील निवड झालेल्या विजाभज कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन देवून त्यांना 269 चौ.फु.चे घर बांधून देणे. आणि उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
 • प्रतिवर्षी 34 जिल्हयातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी 3 गावे निवडून त्या गावांतील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ देणे.
 • पालात राहणारे, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा परित्यक्ता किंवा अपंग महिला व पूरग्रस्त अशा कुटुंबाची प्राधान्याने निवड केली जाते.
 • घर व भुखंड हे संयुक्तपणे पती पत्नीच्या नावे केले जाते. मात्र, विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्या नावेच केले जाते.
 • भूखंड व घर कोणालाही हस्तांतर करता येत नाही व विकता येत नाही. तसेच सदरहू भूखंड अथवा घर भाडे तत्वावर सुध्दा देता येत नाही व पोटभाडेकरु सुध्दा ठेवता येत नाही.
 • सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर व उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांनी शासकीय जमिनीची निवड करणे, शासकीय जमीन नसल्यास खाजगी जमीन निश्चित करुन खरेदी करणे, लाभार्थी निवड करणे, लेआऊट तयार करुन भूखंडावर घर बांधून देणे, पायाभुत सुविधा पुरविणे, विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे इ. कामे करणे आवश्यक आहे.
7 अर्ज करण्याची पध्दत संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करणे.
8 योजनेची वर्गवारी सामाजिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण .

सांख्यिकी माहिती

(रु. लाखात )

सांख्यिकी माहिती
अ. क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 265.31 80
2 2013-14 383.37 80
3 2014-15 1.36 0
विमुक्त जाती, भटक्या जमाती,
इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय,
3 चर्च पथ, महाराष्ट्र राज्य पुणे 1,
ई मेल : jdvjnt@maharashtra.gov.in
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे