श्री. राजकुमार बडोले

श्री. राजकुमार बडोले
माननीय मंत्री
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
 • नाव
  राजकुमार सुदाम बडोले
 • जन्म दिनांक
  28/03/1962
 • वय
  53 वर्ष
 • आईचे नाव
  गंगाबाई सुदाम बडोले
 • वडिलांचे नाव
  सुदाम बडोले
 • पत्नी
  शारदा राजकुमार बडोले
 • सुपुत्री
  श्रुती राजकुमार बडोले
 • सुपुत्र
  अनिकेत राजकुमार बडोले
  स्वप्नील राजकुमार बडोले
 • शिक्षण
  स्थापत्य अभियांत्रिकी (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग)

शुभ संदेश

माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडूनच माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर होत आहे. विविध क्षेत्रांसह शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. हीच बाब हेरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संकेतस्थळ विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

स्मार्ट फोन व इंटरनेट या माध्यमामुळे जग जवळ आले आहे. राज्यातील खेडयापाडयांपर्यंत स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर वाढला आहे. या माध्यमांचा वापर सामाजिक न्याय विभागाची माहिती, योजना व त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास मला वाटतो. या माध्यमातून सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज, वसतिगृह प्रवेशाचे अर्ज, विविध योजनांसाठी लागणारे अर्ज एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यामुळे दप्तर दिरंगाई टाळून जनतेला जलद गतीने सेवा देणे शक्य होणार आहे.

गतिमान व पारदर्शक सेवा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरुनच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वाटचाल या पुढील काळात होणार आहे. विभागाचे हे संकेतस्थळ अद्ययावत, युजर फ्रेंडली व इंटरॲक्टिव्ह व्हावे, जेणेकरुन जनतेला दर्जेदार सेवा देता येईल, त्यासाठी या संकेतस्थळाला माझ्या खूप शुभेच्छा....

राजकुमार बडोले, मंत्री,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे