माहितीचा अधिकार
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नागरिकांच्या सरकारी माहितीच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देण्याचे आदेश देते.
- माहितीचा अधिकार अधिनियमाचा मूलभूत उद्देश नागरिकांना सशक्त करणे, सरकारच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे, भ्रष्टाचार रोखणे आणि आपल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकांसाठी कार्यशील बनवणे हा आहे. माहिती असलेला नागरिक शासनाच्या साधनांवर आवश्यक देखरेख ठेवण्यासाठी आणि सरकारला अधिक जबाबदार बनवण्यासाठी अधिक सुसज्ज असतो. हा अधिनियम नागरिकांना सरकारच्या क्रियाकलापांबद्दल माहिती देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
- या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल.
भेट : https://rtionline.maharashtra.gov.in/