सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो : राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक इबीसी-2003/प्र.क्र.184,/मावक-2,दि.18 सप्टेंबर,2003
योजनेचा उद्देश :
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजनेचे नाव : सुरु करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती पात्रतेचे निकष :
- विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
- विद्यार्थी मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
लाभाचे स्वरुप :
- नाशिक, पुणे, सातारा चंद्रपूर येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्याची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी,पॉकेट मनी इत्यादीवर होणा-या संपुर्ण खर्चाची प्रतीपुर्ती करण्यात येते.
- इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
संबंधित सैनिक शाळेचे प्राचार्य
Application Form : या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login
या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक