साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)
- मातंग समाजाकरीता कलात्मक, समाज कल्याण साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत. कलावंत साहित्यिक व समाज सेवक असावेत.
- वरील क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य् केलेले असावे.
- व्यक्ती व संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही.
- महिला ३० टक्के पर्यंत असाव्यात.
- पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक व समाज सेवक यांचा विचार केला जाईल.
पुरस्काराचे स्वरुप (व्यक्ती)
२५ व्यक्तींना रु.२५ हजार (धनाकर्ष)
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)
- समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य , अंधश्रध्दा निर्मुलन जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्था.
- मातंग समाजाच्या कल्याणासाठी ३० वर्षाहून अधिक मौलिक काम असावे.
- मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरुप (संस्था)
६ संस्थाना रु.५० हजार (धनाकर्ष)
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सर्व नमुद कागदपत्रांसह दाखल करावेत.