संजय गांधी निराधार अनुदान योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेतंर्गत १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्धर आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
- या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
लाभार्थी:
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
फायदे:
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.