राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
लाभार्थी:
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
फायदे:
एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.