राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो : राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक- इबीसी-2017/ प्र.क्र.402/शिक्षण-1, दि.08 नोव्हेंबर,2017
योजनेचा उद्देश :
- एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरीता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजनेचे नाव : कार्यान्वित करण्यात आली आहे.
योजनेच्या प्रमुख अटी :
- विद्यार्थी अनुसूचित व नवबौध्द जातीचा असावा. व सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाख पर्यंत असावे.
- विद्यार्थी या योजनेसाठी शासन निर्णय दि. 8 नोव्हेंबर, 2017 सोबत जोडलेल्या शासन परिशिष्ट ब अन्वये महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा. (उदा. IIM,IIT,NIT,IISER,IIIT,IIIM)
- सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी इ.10 वी 12 वी ची परिक्षा मंडळ महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड / केंद्रीय बोर्ड(CBSE) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक परिक्षांमध्ये किमान 55 % गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावे.
लाभाचे स्वरुप :
- संस्थेने आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क.
- क्रमिक पुस्तके – रु 5,000/- व शैक्षणिक साहित्य रु. 5,000/- असे एकूण प्रतिवर्षी रु. 10,000/-
अर्ज करण्याची पध्दत :
- विहित नमुन्यातील अर्ज भरणे (मॅन्युअली)
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालयाचे नांव : आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे