राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :
- राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रं.इबीसी-2003/ प्र.क्र.115/मावक-2, दि.11 जून,2003
योजनेचा उद्देश :
- इयत्ता 10 वी 12 वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळविणा-या अनु. जातीच्या मुला-मुलींना राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.
योजनेचे नाव :
- ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव : अनुसूचित जाती
पात्रतेचे निकष :
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक बोर्डामधुन प्रथम आलेल्या अनु. जाती प्रर्वगाच्या विद्यार्थ्यास
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनु. जातीच्या विद्यार्थ्यास
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून जिल्हयात प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून तालुक्यात प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास
- सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इ. 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास
लाभाचे स्वरुप :
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक बोर्डामधुन प्रथम आलेल्या अनु. जाती प्रर्वगाच्या विद्यार्थ्यास रु. 1.00 लाख रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनु. जातीच्या विद्यार्थ्यास रु. 50 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून जिल्हयात प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास रु. 25 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
- सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून तालुक्यात प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास रु. 10 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
- सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इ. 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यास रु. 5 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त
अर्जाचा नमुना : संबंधित जिल्हायाचे कार्यालयात अर्ज मिळतील