राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो : राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय : क्र. ईबीसी-2003/प्र.क्र.115/मावक-2,दि : 11/06/2003
योजनेचा उद्देश :
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचा दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकुन राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजनेचे नाव : कार्यान्वित करण्यात आली आहे.
पात्रतेचे निकष :
- इयत्ता 10 वी मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणा-या अनू. जातीच्या मुला-मुलीसाठी ही योजनेचे नाव : लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजनेचे नाव : इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकणा-या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनु. जातीच्या मुला-मुलीसांठी आहे.
लाभाचे स्वरुप :
- इयत्ता 11 वी दरमहा रू 300/- (10 महिन्यासाठी 3000 रू.)
इयत्ता 12 वी दरमहा रू 300/- (10 महिन्यासाठी 3000 रू.)
अर्जावर होणारी प्रक्रिया :
- विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयास सादर होतो. संबंधित महाविद्यालयाकडून अर्ज व कागदपत्राची छाननी करुन सदरचे अर्ज संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केले जातात.
- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून सदर अर्ज मंजुर होऊन सदर विद्यार्थ्याचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क रक्कम संबंधित महाविद्यालयाच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येते.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य
अर्जाचा नमुना : http//mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक