बंद

    मुदती कर्ज योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
    • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
    • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
    • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
    • (अ)अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८,०००/- व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/- पर्यंत असावे.
    • (ब)राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१,००,०००/- पर्यंत असावे.
    • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
    • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
    • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
    सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)
    अ.क्र. वर्ष खर्च लाभार्थी
    २०२१-२२ २१३४ १२
    २०२२-२३ ७४८
    २०२३-२४ ६१२

    लाभार्थी:

    अनुसूचित जातीतील चर्मकार समाज

    फायदे:

    एनएसएफडीसी यांच्या विविध योजनांना उद्योगांना रु.१ लाख ते रु.२.५ लाख मुदती कर्ज सहाय्यता देते. तसेच वाहनांसाठी कर्ज मर्यादा वेगवेगळी आहे. सदर उद्योगाच्या लागत किंमतीच्या ७५ टक्के मुदती कर्ज देण्यात येते. त्याचबरोबर या महामंडळाकडून २० टक्के बीजकर्ज व रु.१००००/ अनुदान देण्यात येते. उर्वरित ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो. मुदती कर्जावर एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ७ टक्के तसेच महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. रुपये ५ लाखापेक्षा जास्त उद्योगाच्या कर्जातील एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ८ टक्के आहे व महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. मुदती कर्ज परतफेड दरमहा करावी लागेव व त्याचा कालावधी ६० हप्त्यांपर्यंत आहे.

    अर्ज कसा करावा

    अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
    अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.