बंद

    मुख्यमंत्री वयोश्री योजना (राज्य)

    • तारीख : 06/02/2024 -

    शासन निर्णय –

    • शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2022/प्र.क्र.344/सामासु, दि. 6.02.2024
    • शासन निर्णय क्र. ज्येष्ठना-2022/प्र.क्र.344/सामासु,दि. 11.03.2024
    • शासन निर्णय क्र. ज्येष्ठना- 2022/ प्र.क्र.344/ सामासु, दि. 19.08.2024

    योजनेचा मुख्य उद्देश –

    • राज्यातील वय 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करणेकरीता,तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवणे

    योजनेच्या प्रमुख अटी –

    • ज्येष्ठ नागरिक /लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    • लाभार्थ्याचे वय 65 वर्षे पूर्ण असावे.
    • एकूण लाभार्थ्यांपैकी 30 टक्के महिला असणे आवश्यक आहे.
    • लाभार्थ्याकडे पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड / राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा आवश्यक आहे.
    • लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2 लक्ष च्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
    • मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे.

    लाभाचे स्वरुप –

    • एकवेळ एकरकमी रु.3000/- च्या मर्यादेत ज्येष्ठ नागरिकांच्या आधार संलग्न वैयक्तिक बॅक खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येतात.

    आवश्यक कागदपत्रे –

    1. आधारकार्ड / मतदान कार्ड
    2. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
    3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
    4. स्वयंघोषणापत्र
    5. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे

    अंमलबजावणी यंत्रणा –

    शहरी क्षेत्रासाठी   ग्रामीण क्षेत्रासाठी
    अध्यक्ष आयुक्त महानगरपालिका   अध्यक्ष जिल्हाधिकारी
    सदस्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका,

    महिला व बालविकास अधिकारी

      सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद
    सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद

    जिल्हा शल्य चिकित्सक,आरोग्य विभाग

    सहसंचालक / समकक्ष अधिकारी, महिला व बालविकास

    सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण   सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त, समाज कल्यण / जिल्हा समाज कल्याण अधिकारी

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेखित