बंद

    मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDR)

    • तारीख : 25/11/2021 -

    शासन निर्णय
    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक:- डीडीपी २०१९/प्रक्र.११०/सामासू २५ नोव्हेंबर २०२१.

    योजनेचा उद्देश
    मादक पदार्थांचे गैरवर्तन करणे या समस्येच्या मुख्य कारणांमध्ये मुख्यतः मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे इत्यादी महत्वाच्या बाबींसाठी योजना तयार करुन त्यास प्रतिबंध घालणे ही काळाची गरज आहे. संविधानिक तरतुदी लक्षात घेवून, नागरिकांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सदर केंद्र योजना राबविणे.

    योजनेचे स्वरूप :- 100% केंद्र पुरस्कृत योजना

    • व्यसनमुक्तीबाबत प्रतिबंधात्मक शिक्षण व जागरुकता निर्मिती :- ज्या ठिकाणी व्यसनाधीन वर्ग जास्त प्रमाणात वास्तव्य करत असेल (शिक्षणाचे ठिकाण, कामाचे ठिकाण, झोपडपट्टी) या ठिकाणी प्रतिबंधात्मक शिक्षण वर्ग व जनजागृतीची कार्यशाळा आयोजित करुन त्यांना व्यसनाचा धोका व प्रभाव याची जाणिव करुन दिली जाऊ शकते व त्यासाठी व्यवसायिक लोकांचा सहभाग घेऊन उपचार केले जाऊ शकतात. तसेच इतर केंद्रिय मंत्रालये, राज्य सरकार, विद्यापिठे, प्रशिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने कार्यक्रम राबविले जातील.
    • व्यसनाधीन व्यक्तींची ओळख, उपचार, देखभाल, पुनर्वसन इ. विषयावर प्रशिक्षण देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम
    • उपचार आणि पुनर्वसन या घटकांतर्गत रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, कारागृह सारख्या ठिकाणी व्यसनमुक्ती / पुनर्वसन केंद्रे स्थापन करणे व सहाय्य करण्यात भर देणे.
    • गुणवत्तेची मानके सुरक्षित करण्यासाठी विविध प्रवर्गातील व वयोगटातील व्यसनींच्या व्यसनांच्या उपचारासाठी मॉडल विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. देशभरातील अंमली पदार्थांच्या / व्यसनमुक्ती सुविधांच्या गुणवत्तेचे प्रमाणिकरण व गुणवत्ता सुधारणे.
    • अंमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्ती आणि गटांमध्ये सामुहिक पुढाकार स्वयंसहाय्य प्रयत्नास चालना देण्यासाठी असुरक्षित भागावर लक्ष केंद्रीत करणे, IRCA चा अभिप्राय घेणे व पुढील कार्यक्रम राबविणे.
    • तरुणांना प्रशिक्षण देवून व्यसनाधीन तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करणे
    • व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे व Outreach and Drop-in-centres ही केंद्र निर्माण करणे
    • कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण व उदारनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणे या घटकांतर्गत व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणे
    • .

    लाभाचे स्वरूप

    • सदर योजनेचा रक्कम रुपये 5,87,00,000/-(अक्षरी पाच कोटी सत्यांशी लक्ष रुपये) चा कृती आराखडा शासन पत्र क्र.DDP-2019/C.R.110 dated02.08.2023 अन्वये केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद