बंद

    मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती

    • तारीख : 31/03/2016 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो: राज्य (१००%)

    GR (शासन निर्णय):

    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय :क्र.इबीसी-2016/प्र.क्र.221/शिक्षण-1, दि : 31 मार्च, 2016

    योजनेचा उद्देश:

    • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.

    पात्रतेचे निकष:

      1. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवगातील असावा
      2. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखपेक्षा जास्त असावे
      3. विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा.
      4. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा

    लाभाचे स्वरुप :

    • शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे वय विचारात न घेता सर्व जिल्हा स्तरावरील मान्यता प्राप्त मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय :संबंधित महाविद्यालय व संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
    अर्जाचा नमुना: http//mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक