महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रीकपुर्व शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :
- राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रं.इबीसी-2011/ प्र.क्र.97,/ शिक्षण-1, दि.30 डिसेंबर,2011
योजनेचा उद्देश :
- दिनांक 24.12.1970 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या व ज्या विदयार्थ्यांचे पालक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असतील अशा विदयार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता सर्व स्तरावरील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने केली जाते.
- शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 13.6.1996 च्या शासन निर्णयान्वये प्रमाणित दराने शुल्क आकारणा-या शासान मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत संस्थांमधील मागासवर्गीय विदयार्थ्यांचे शिक्षण शुल्क व सत्र शुल्क अदा केले जाते.
- खाजगी विनाअनुदानीत व कायम विनाअनुदानीत शाळांमध्ये इ.1 ली ते इ.10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जाती, विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती सन 2011-12 या शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी 10 महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येते.
पात्रतेचे निकष :
- अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- विदयार्थ्यांचे पालक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असतील अशा विदयार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता सर्व स्तरावरील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती.
- खाजगी विनाअनुदानीत व कायम विनाअनुदानीत शाळांमध्ये इ.1 ली ते इ.10 वी च्या वर्गात
- शिक्षण घेत असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती
लाभाचे स्वरुप :
-
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय प्रतिपुर्ती दर
- अ.क्र. इयत्ता विद्यार्थ्यांना द्यावयाची दरमहा शिक्षण शुल्क + परीक्षा शुल्काची प्रतिपुर्ती (वर्षातून दहा महिने कालावधीसाठी)
1 | 1 ली ते 4 थी | रु.100/- दरमहा |
2 | 5 वी ते 7 वी | रु.150/- दरमहा |
3 | 8 वी ते 10 वी | रु.200/- दरमहा |
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद
अर्जाचा नमुना : या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login
या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक