महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मागासवर्गीय मुला /मुलींकरिता मॅट्रीकपूर्व शिक्षण फी व परिक्षा फी योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- खाजगी विनाअनुदानीत व कायम विनाअनुदानीत शाळांमध्ये इ. १ ली ते इ. १० वी च्या वर्गात शिक्षण घेत असावे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनु. जातीतील विदयार्थी असावे.
लाभाचे स्वरुप
- प्रमाणित दराने शुल्क आकारणा-या शासान मान्यताप्राप्त अशासकीय, अनुदानीत व विनाअनुदानीत संस्थांमधील मागासवर्गीय विदयार्थ्यांचे संपुर्ण शिक्षण शुल्क व सत्र शुल्क अदा केले जाते.
- विद्यार्थ्यांना द्यावयाची दरमहा शिक्षण शुल्क + परीक्षा शुल्काची प्रतिपुर्ती (१० महिनेसाठी) :
इयत्ता 1 ली ते 4 थी : रु.100/- दरमहा
इयत्ता 5 वी ते 7 वी : रु.150/- दरमहा
इयत्ता 8 वी ते 10 वी : रु.200/- दरमहा
लाभार्थी:
अनुसुचित जाती
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.