भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचा उद्देश :
- शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलामुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणे.
पात्रतेच्या अटी :
- विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
- शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
- विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक ज्या राष्ट्रीयकृत/शेड्यूल्ड बॅकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रू. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न
- मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या त्या प्रमाणात लागू राहील.
- विद्यार्थी स्थानिक नसावा.
- महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत शिकत असलेल विद्यार्थीसुध्दा या योनजेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
- तालुक्याच्या ठिकाणी उच्च् शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम रु. 38000/- प्रति वर्ष येवढी आहे.
- विद्यार्थी 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच शिक्षण घेणारा असावा.
- 11 वी मध्ये प्रेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
- 12 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/ पदव्युत्तर शिक्षणाकरीता लाभ घेता येईल.
- पदवी, पदविका, दोन वर्षापेक्ष्ज्ञा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरीता किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
- या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात कोठेही शिकत असला तरी तो ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्याच जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे विद्यार्थ्यानी अर्ज करावेत.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
https://hmas.mahait.org/