बीज भांडवल योजना
योजनेची संक्षिप्त माहिती:
- रु.50,001/- ते रु.5,00,000/- पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणा-या कोणत्याही योजनेसाठी बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या व्याज दराने उपलब्ध करण्यांत येतो.
- या योजने अंतर्गत रु.50,001/- पासून ते रु.5,00,000/- पर्यतचा कर्ज पुरवठा द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो.
- या योजने अंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमेपैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते.
- 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वत:चा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते.
- त्या रक्कमेपैकी रु.10,000/- अनुदान म्हणून देण्यात येतात तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते.
- या योजनेअंतर्गत मिळणा-या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक समान हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.