बंद

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

    • तारीख : 01/01/2000 -

    पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

    • अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह.
    • अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी निवासी शाळा/ आश्रमशाळा.
    • अनुसूचित जातीच्या मुलामुलींची अनुदानित वसतिगृहे
    • प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहील.
    • संस्थांची तपासणी करुन समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
    • पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाल्यास चिठ्ठी पध्दतीने संस्थेची निवड करण्यात येईल.
    • प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी संस्था ५ वर्षे कालावधी पर्यंत पुन्हा पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
    • ज्या संस्थेविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.
    • कोणतीही संस्था एकाचे वेळी दोन पारितोषिक मिळविण्यास पात्र राहणार असणार नाही.

    पुरस्कारांची संख्या (संस्था)
    राज्यस्तर: ३
    विभागीय स्तर(६ महसूल विभागात प्रत्येकी ३ याप्रमाणे १८ पुरस्कार)

    पुरस्काराचे स्वरुप (शासकीय/अशासकीय संस्था)

    राज्यस्तरीय पुरस्कार: ३

    प्रथम पुरस्कार रु. ५ लक्ष
    द्वितीय पुरस्कार रु. ३ लक्ष
    तृतीय पुरस्कार रु. २ लक्ष

    विभागीय स्तर पुरस्कार: १८

    प्रत्येक प्रवर्गामधुन उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस रु.१.०० लक्ष पारितोषिक देण्यात येते.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सर्व नमुद कागदपत्रांसह दाखल करावेत.