बंद

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

    • तारीख : 01/01/2000 -

    पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)

    • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय जाती कल्याण, दिव्यांग कल्याण व समाज कल्याण क्षेत्रात 10 वर्षे वैयक्तीक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती.

    पुरस्काराचे स्वरुप (व्यक्ती)

    • 51 व्यक्तीना रु. १५ हजार (धनाकर्ष)

    पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

    • समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण ,आरोग्य, अन्याय निर्मूलन अंधश्रध्दा निर्मूलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था
    • संस्थेचे वरील समाज कल्याण क्षेत्रात 10 वर्षाहून अधिक उल्लेखनीय कार्य आवश्यक
    • संस्थेमध्ये कोणताही परव्यवहार नसावा
    • मागील 5 वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक

    पुरस्काराचे स्वरुप (संस्था)

    • 10 संस्थांना रु.25 हजार एक (धनाकर्ष)

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सर्व नमुद कागदपत्रांसह दाखल करावेत.