गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना
राज्य पुरस्कृत योजना
- सदरची योजना सन 1997 पासून सुरु करण्यात आली
- 2006-2007 या वर्षापासून सदर योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे
शासन निर्णय
- सा.न्या.व.वि.क्रमांक गटई-2008/प्र.क्र.219 /शिक्षण-1 दिनांक,13 फेब्रुवारी,2008
- सा.न्या.व.वि.क्रमांक गटई -2015/प्र.क्र.219 /शिक्षण-1 दिनांक,04 डिसेंबर,2015
- सा.न्या.व.वि.क्रमांक गटई -2017/प्र.क्र.312 /शिक्षण-1 दिनांक,07 फेब्रुवारी,2018
योजनेचा उद्देश
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हा-तान्हात बसून आपली सेवा देत असतात. या व्यवसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी 100 टक्के अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे
योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार/ लाभार्थी हा अनुसुचित जातीचा गटई कामगार असावा
लाभाचे स्वरूप
- लोखंडी पत्र्याचे स्टॉल विनामुल्य देण्यात येते
साहित्य खरेदी करीता रुपये- 500/- अनुदान देण्यात येते
संपर्क
- संत रोहिदास चर्मकार व चर्मोदयोग विकास महामंडळ
लाभार्थी:
गटई कामगारांना
फायदे:
same as above
अर्ज कसा करावा
संत रोहिदास चर्मकार व चर्मोदयोग विकास महामंडळ