केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC) / राज्य शासनाच्या योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
- अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे
- अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोटजातील असावा.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडलेला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
- शहरी व ग्रामिण भागातील अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. १,००,०००/- पर्यत असावे.
- अर्जदाराने या महामंडळाकडुन व इतर कोणत्याही शासकिय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- महामंडळाने वेळोवेळी घालुन दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बधंनकारक राहतील.
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
१ | २०२१-२२ | ६१.५ | ४७६ |
२ | २०२२-२३ | ५६.१ | ३८८ |
३ | २०२३-२४ | २८९.०६ | २६५ |
लाभार्थी:
अनुसूचित जाती मातंग समाजातील 12 पोटजातीं पुढील प्रमाणे.मांग, मदारी, मातंग, राधेमांग, मिनी मादींग, मांग गारूडी, मादींग, मांग गारोडी, दानखणी मांग, मादगी, मांग महाशी, मादिगा
फायदे:
वैयक्तीक कर्ज योजना
अर्ज कसा करावा
अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे:
• अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.)
• अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.)
• नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रति जोडाव्यात.
• राष्ट्रीय अनुसूचित जाती,जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज
फोटोच्या 3 प्रती जोडाव्यात.
• अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला
• रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती.
• ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
• ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरवा.
• एन.एस.एफ.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसेन्स व आर.टी.ओ. कडील परवाना इत्यादी.
• वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्यल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता/कंपनी कडील दरपत्रक.
• व्यवसायासंबबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
• व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
• प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपरवर)