बंद

    कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (अनु.जाती)

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
    • वराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 वर्षपेक्षा कमी असू नये.
    • जातीचे प्रमाणपत्र सक्षम व प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे.
    • वधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील.
    • दाम्पत्यातील वधू / वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्दासह) प्रवर्गातील असावेत.
    • बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य/कुटुंब यांचेकडून झालेला नसावा या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.
    • स्वयंसेवी संस्थेची नोंदणी झाली पाहिजे; स्वयंसेवी संस्थेने २० जोडप्यांचा समावेश असलेला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करावा.

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती (नवबौध्दांसह)

    फायदे:

    महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना रु २०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु ४,०००/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित स्वंयसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.