कन्यादान योजना
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र.सावियो-2003/प्र.क्र.60/सुधार-1,दि.24/12/2003
- शासन निर्णय क्र.सावियो-2005/प्र.क्र.41/सुधार-1, दिनांक 18 डिसेंबर 2008
- शासन निर्णय क्र.सावियो-2015/प्र.क्र.105/सामासू, दि.15/10/2016
योजनेचा मुख्य उद्देश
- विवाह प्रसंगी पालकांवरील आर्थिक भार कमी होणेसाठी अनुसूचित जातीच्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य उपलब्ध
करुन देणे
योजनेच्या प्रमुख अटी
- वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरुपी रहिवाशी असावेत.
- वराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 वर्ष पुर्ण असावे.
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.
- वधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील.तथापी,विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी सुध्दा लाभ देण्यात येईल
- नवदांपत्यांतील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्द) प्रवर्गातील असावा.
- बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पंत्य/कुटूंब यांचे कडून झालेला नसावा, या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक
- सामुहिक विवाह सोहळ्यासाठी कमीत-कमी 10 दाम्पत्यांचे विवाह एकाच वेळी संस्थेने आयोजित करणे आवश्यक
लाभाचे स्वरुप
- रु.20,000/- इतकी रक्कम वधुचे वडील, आई किंवा पालक यांचे नांवे रेखांकित धनादेशाद्वारे विवाहाचे दिवशी देण्यात येते.
- सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजक संस्था वा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे रु.4000/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण