बंद

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन

    • तारीख : 01/08/2019 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :

    • राज्य शासन

    GR (शासन निर्णय) :

    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रं.व्यप्रशु-2019/ प्र.क्र.173/शिक्षण-1, दि.01 ऑगस्ट,2019

    योजनेचा उद्देश :

    • अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्याना तांत्रिक शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात व्यवसायिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजनेचे नाव : लागू करण्यात आलेली आहे.

    योजनेचे नाव ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव :

    • अनुसूचित जाती

    पात्रतेचे निकष :

    • विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकांतील असावा.
    • विद्यार्थी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारा असावा.

    लाभाचे स्वरुप :

    • संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडुन दरमहा रु.60/- विद्यावेतन देण्यात येते त्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.40/- पुरक विद्यावेतन देण्यात येते.
    • तंत्रशिक्षण विभागाकडुन ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही त्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.100/- विद्यावेतन देण्यात येते.
    • पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.65290/- पेक्षा जास्त नसावे.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय : संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद

    अर्जाचा नमुना : संबंधित जिल्हायाचे कार्यालयात अर्ज मिळतील