बंद

    इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 व 65 वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते.
    • केंद्र शासनाकडून 65 ते 79 वर्ष वयोगटातील पात्र वृध्द व्यक्तींना दरमहा रु.200/- तर 80 वर्ष व त्यावरील पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा रु.500/-
    • याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून 65 ते 79 वर्ष वयोगटातील पात्र वृध्द व्यक्तींना दरमहा रु.1300/- तर ८० वर्ष व त्यावरील पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा रु.1000/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.

    लाभार्थी:

    सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

    फायदे:

    इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.