आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य
केंद्र पुरस्कृत (50%राज्य व 50% केंद्र)
शासन निर्णय
- शासन निर्णय दिनांक 30/01/1999
- शासन निर्णय दिनांक 1/02/2010
योजनेचा मुख्य उद्देश
समाजातील जातीव्यवस्था नष्ट होवून सामाजिक समता प्रस्थापित होणेकरिता अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती
मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देणे
योजनेच्या प्रमुख अटी
- लाभार्थी हा महाराष्ट्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असावा.
- लाभार्थी , विवाहीत जोडप्या पैकी एक व्यक्ती हा अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व दुसरी व्यक्ती सुवर्ण, हिंदू, लिंगायत, जैन किंवा शीख प्रवर्गातील असावी.
- विवाह नोंदणीकृत असावा.
- विवाह समयी वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- दोन प्रतिष्ठित व्यक्तीची शिफारस पत्रे आवश्यक
लाभाचे स्वरुप
- रुपये 50,000/- प्रती दाम्पत्य (जोडपे)
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद