बंद

    आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा
    • लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.(जातीचा दाखला देणे आवश्यक)
    • लाभार्थी / विवाहीत जोडप्याकडे विवाह नोंदणी / दाखला असावा.
    • लग्नसमयी वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.(वर व वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले आवश्यक)
    • दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे
    • वधु / वराचे एकत्रित फोटो.
    • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिंदू लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असेल तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहाससुद्धा आंतरजातीय विवाह संबोधण्यात येईल.

    लाभार्थी:

    महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी

    फायदे:

    आंतर जातीय विवाहास रु ५०,०००/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.

    अर्ज कसा करावा

    विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.