बंद

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे.

    • तारीख : 05/12/2011 -

    राज्य पुरस्कृत योजना

    शासन निर्णय

    • शासन निर्णय क्र.एसीडब्ल्यू-1074/58-व्ही, दिनांक 14 जुन 1974.
    • शासन निर्णय क्र.दवसू-2011/प्र.क्र.442/अजाउयो, दिनांक 5 डिसेंबर, 2011.
    • शासन निर्णय क्र. दवसू-2013/प्र.क्र. 85/अजाक-1, दि. 1/08/2013.
    • शासन निर्णय क. दवसु-2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि. 27/5/2015
    • शासन निर्णय क्र. विघयो-2010/प्र.क्र.26/विघयो, दि. 13/4/2017
    • शासन निर्णय क्र. संकीर्ण-2021/प्र.क्र.79/अजाक, दिनांक 6/10/2021

    योजनेचा मुख्य उद्देश

    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचे राहणीमान सुसहय व्हावे, राहणीमानात सुधारणा व्हावी.

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती (लोकसंख्यानिहाय अनुदान मंजूर करण्यात येते)

    लाभाचे स्वरूप

    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उदा. पाणी पुरवठा, मलनि:सारण, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, विज पुरवठा व समाज मंदिर, संविधान सभागृहाचे बांधकाम करणे, पेव्हर ब्लॉक, इ. सोईसुविधा उपलब्ध करुन देणेसाठी प्राधान्यक्रमाने कामांसाठी खालीलप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देणेत येते.
    क्र. वस्तींची लोकसंख्या अनुदानाची रक्कम (लाखात)

    (शा.नि. 5 डिसेंबर 2011)

    अनुदानाची रक्कम (सुधारीत)

    (शा.नि. 6 ऑक्टोबर 2021)

    1 10 ते 25 2.00 4.00
    2 26 ते 50 5.00 10.00
    3 51 ते 100 8.00 16.00
    4 101 ते 150 12.00 24.00
    5 151 ते 300 15.00 30.00
    6 301 च्या पुढे 20.00 40.00

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद