अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत
योजनेच्या प्रमुख अटी
सदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या तीन अटी खालील प्रमाणे-
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
लाभार्थी:
अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी
फायदे:
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील.