अनुसूचित जातीच्या मुला-मुलीसाठी मागासवर्गीय शैक्षणिक संस्थावरील सोयीसुविधा वाढविणे
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :
- महाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देश :
- अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता सोयी सुविधा पुरविणे.
पात्रतेचे निकष :
- सदर लाभार्थी हा शासकीय वसतीगृहात किवा शासकीय निवसी शाळेत प्रवेशित असावा.
लाभाचे स्वरुप :
मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा, प्रत्येक वसतिगृहात ॲक्वागार्ड व वॉटरकूलर, गरम पाण्याची सुविधा.
- 10 विद्यार्थ्यांमागे एक संगणक प्रिंटर व इंटरनेट सुविधेसह, वसतीगृहात फायर फायटिंग सुविधा, पेस्ट कंट्रोलची सुविधा इ.
- शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नाईट ड्रेस
- क्रमिक पाठय पुस्तके, वहया, स्टेशनरी इत्यादी. ग्रंथालयीन पुस्तके.
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विथ्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन,ड्रॉईग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विद्यार्थ्यासाठी रंग, ड्रॉईग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी.
- मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त रू. 100 दरमहा
- वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभता दरमहा खालीलप्रमाणे
- विभागीय पातळीवर – रू. 800/- जिल्हा पातळीवर – रू. 600/- तालुका पातळीवर- रु.500/
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे