बंद

    अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

    • तारीख : 27/06/2019 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो: राज्य शासन

    योजनेचा उद्देश :

    • अनु. जातीच्या मुलामुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्याची गुणवत्ता असुनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अनु. जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणात संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा या उददेशाने सदर योजनेचे नाव : सुरु करण्यात आली.

    GR (शासन निर्णय) :

    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय : क्र. इबीसी-2017/प्र.क्र.288/शिक्षण-1, दि : 27/06/2017 व दि.20.07.2023 दि.30.10.2023 व दि.09.11.2023

    पात्रतेचे निकष :

    • विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा.
    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
    • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
    • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
    • परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणा-या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही.
    • परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनज्ञेय राहील.
    • भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.
    • यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे असे विद्यार्थी देखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
    • परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी.
      पदव्यत्तर पदवी किंवा परव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक.
    • सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विदयार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.

    लाभाचे स्वरुप :

    • विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच विदयार्थ्यांस आवश्यक आरोग्य विमा (Health Insurance) परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील.
    • विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर 15,400 तर यु.के.साठी जी.बी.पौंड 9,900 इतका अदा करण्यात येतो.
    • विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.

    अर्जावर होणारी प्रक्रिया : मॅन्युअली

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय : आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3,चर्च रोड, पुणे-411 001.
    संपर्क क्रमांक-020-26127569, 26137186 ई-मेल fs-sw-edu@gov.in

    Application Form अर्जाचा नमुना: या योजनेसाठी www.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरुन किंवा उपरोक्त पत्त्यावर अर्ज उपलब्ध होईल.