बंद

    अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संघटनांना अनुदाने

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दि. 16/8/2012 नुसार व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार व्यक्तींसाठी –

    व्यक्तींसाठी :

    1. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
    2. व्यसनमुक्ती क्षेत्रात 15 वर्षे उल्लेखनीय कार्य
    3. वयाची अट नाही
    4. विहित नमुन्यातील अर्ज व इत्यादी.

    संस्थांसाठी :

    1. संस्था नोंदणी अधिनियम, 1860 व मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम, 1950 नुसार नोंदणीकृत असावी
    2. व्यसनमुक्ती क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी कार्यरत
    3. शासनाकडून मान्यताप्राप्त

    व्यसनमुक्ती केंद्रासाठी द्यावयाच्या अर्थसहाय्याबाबत निकष –

    1. विहित नमुन्यातील अर्ज
    2. संस्था नोंदणी अधिनियम, 1860 व मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम, 1950 नुसार नोंदणीकृत असावी
    3. विविध माध्यमातून व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी जिल्हात करणे
    4. संस्था 5 वर्षे जुनी असावी, मागील 5 वर्षाचे लेखा अहवाल आवश्यक
    5. जड संग्रह यादी, औषधांची यादी व लाभार्थी यादी जोडणे आवश्यक
    6. इमारत भाडे करारनामा तसेच इमारतीचा नकाशा
    7. विशेष कार्यक्रमांची छायाचित्रे इ.

    लाभार्थी:

    सर्व प्रवर्गासाठी

    फायदे:

    व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना प्रचार व प्रसिध्दी बाबत विविध कार्यक्रम देवून योजनेची प्रसिध्दी केली जाते. व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्तींना प्रतिवर्षी शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु.15,000/-, शाल, श्रीफळ देण्यात येते तर संस्थेस शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु.30,000/-, शाल, श्रीफळ देवून "व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार" देवून सन्मानीत करण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    व्यसनमुक्ती केंद्रांना अर्थसहाय्यासाठी व शासन निर्णय दि. 16/8/2012 अन्वये व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे पाठविण्यात येतात.