बंद

    शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक

    • तारीख : 01/01/2000 -

    पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

    • राज्य शासनाच्या Rules of Business अनुसार हा विभाग कार्यरत असला पाहिजे.
    • संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागास्वर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व यासारख्या व्यक्तीगत व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेले असले पाहिजे.
    • सदर संस्था संबंधीत क्षेत्रात किमान मागील १० वर्षापासुन कार्यरत असणे आवश्यक आहे.
    • संबधीत संस्था ही मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणीकृत असावी.
    • संस्थेची आर्थिक स्थिती बळकट असली पाहिजे.
    • संबंधीत संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्या विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.

    पुरस्कारांची संख्या (संस्था)
    एकूण १२ पुरस्कार (सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन प्रमाणे १२ संस्था)

    पुरस्काराचे स्वरुप (शासकीय/अशासकीय संस्था)
    रु. ७.५० लक्ष (धनाकर्ष),सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सर्व नमुद कागदपत्रांसह दाखल करावेत.