वृद्धाश्रम
शासनाद्वारे चालवली जाणारी वृद्धाश्रमे
- ज्येष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ चांगल्याप्रकारे घालविता यावा याकरिता “वृध्दाश्रम” ही योजना सन 1963 पासून स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येते. या वृध्दाश्रमामध्ये 60 वर्ष वय असलेले पुरूष व 55 वर्ष वय असलेल्या स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो.
- वरील योजनेशिवाय ज्येष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून “मातोश्री वृध्दाश्रम”, ही योजना शासन निर्णय, दिनांक 17 नोव्हेंबर, 1995 अन्वये स्वयंसेवी संस्थामार्फत सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यात 24 मातोश्री वृध्दाश्रम विना अनुदान तत्वावर सुरू आहेत. वृध्दाश्रमात प्रवेशितांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात.
- प्रत्येक मातोश्री वृध्दाश्रमाची मान्य संख्या 100 इतकी असून यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे, स्वत:चे वार्षिक उत्पन्न रू. 12,000/- पेक्षा जास्त आहे, त्यांचेकडून प्रतिमहा रू. 500/- शुल्क आकारूण प्रवेश देण्यात येतो, तर ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. (50 जागा सशुल्क व्यक्ति व 50 जागा नि:शुल्क व्यक्तिंसाठी)
- वृध्दाश्रमामध्ये प्रवेशासाठी गरजू जेष्ठ नागरिक यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण / जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा.
स्वयंसेवी संस्थांव्दारे चालवली जाणारी वृद्धाश्रमे
- महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांव्दारे “वृध्दाश्रम” ही योजना, शासन निर्णय क्रमांक. एसडब्लू/1063/44945/एन,दिनांक 20/02/1963 अन्वये सुरु करण्यात आली.
- राज्यात आजमितीस स्वयंसेवी संस्थामार्फत 33 वृध्दाश्रम अनुदान तत्त्वावर सुरु आहेत.
- वृध्दाश्रमात 60 वर्षावरील पुरूष व 55 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देण्यता येतो.
- सदरचे वृध्दाश्रम निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, शासनामार्फत प्रवेशितांना परिपोषण म्हणून प्रती व्यक्ती प्रतीमहा, रुपये 900/- प्रमाणे 12 महिन्यांसाठी अनुदान देण्यात येते.
- वृध्दाश्रमात प्रवेशितांना भोजन, प्रथमोपचार, निवास इ. सुविधा मोफत देण्यात येतात.
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केल्याप्रमाणे