पुरस्कार

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देवून त्यांची अर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचविणे.)

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.
2 योजनेचा प्रकार राज्य योजना
3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देवून त्यांची अर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचविणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांसाठी
5 योजनेच्या प्रमुख अटी सदर योजना 1 ते 13 अटीशर्तीच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या अटी खालील प्रमाणे-
लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.

या योजनेंतर्गत लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.

भूमिहीन शेतमजूर परिवक्ता स्त्रिया / विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यांत यावे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन 50% अनुदान व 50% बिनव्याजी कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यांत येते.
7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.
8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती
9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय

सांख्यिकी माहिती-
रुपये- लाखात

सांख्यिकी माहिती
अ.क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-2013 680.38 38
2 2013-2014 982.36 75
3 2014-2015 750.00 42

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जन्म शताब्दी आणि बक्षिस वितरण (रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ व भुमीहिन शेत मंजूर व कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था सदरचा पुरस्कार दिला जातो.)

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जन्म शताब्दी आणि बक्षिस वितरण
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
2. योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य क्रिडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.संकिर्ण-2000/प्र.क्र.308/मावक-1, दिनांक 9 ऑक्टोबर, 2001
3. योजनेचा प्रकार राज्य
4. योजनेचा उद्देश रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ व भुमीहिन शेत मंजूर व कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था सदरचा पुरस्कार दिला जातो.
5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव सर्व प्रवर्गांसाठी.
6. योजनेच्या प्रमुख अटी समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी व्यक्ती व नोंदणीकृत संस्था असावी.
सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.
व्यक्तीचे वय 50 व स्त्रीचे वय 40 वर्ष असावे.
पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.
7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप व्यक्तीस रु. 51,000/- व संस्थेस रक्कम रु.51,000/-

स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ
8. अर्ज करण्याची पध्दत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.
9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
10 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

सांख्यिकी माहिती
(रुपये लाखात)

सांख्यिकी माहिती
अ.क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1. 2012-13 30.40 1 व्यक्ती व 1 संस्था
2. 2013-14 -- --
3. 2014-15 30.00 2 व्यक्ती व 2 संस्था

शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना (महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामा

शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना
2. योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2009/प्र.क्र.23/बांधकामे, दिनांक 31 ऑगस्ट, 2012
3. योजनेचा प्रकार राज्य
4. योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देणे.
5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्र राज्यातील
सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील संस्था
6. योजनेच्या प्रमुख अटी समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी नोंदणीकृत संस्था असावी.
सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.
संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.
7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप एकूण 6 विभागातील प्रत्येकी एक प्रमाणे 6 संस्थांना प्रत्येकी रु. 15 लाख प्रमाणे पारितोषिकाची रक्कम देण्यात येते.
स्मृतीचिन्ह, चांदीचा स्क्रोल, सन्मानपत्र
8. अर्ज करण्याची पध्दत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.
9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
10. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

सांख्यिकी माहिती
(रुपये लाखात)

सांख्यिकी माहिती
अ.क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1. 2013-14 90.00 6 संस्था
2. 2014-15 90.00 6 संस्था
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे