बंद

    जाहिरात

    भूतकाळ फिल्टर करा जाहिरात
    जाहिरात
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहिरात

    व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणे करुन व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढवितांना सर्व समावेशकता निर्माण करणे, त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेवून ” राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” देवून गौरविण्यात येते.

    11/02/2025 22/02/2025 पहा (7 MB) डाउनलोड
    महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान जाहिरात

    सामाजिक न्याय विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेवून प्रत्येक महसूल विभागातून ०२ संस्था या प्रमाणे ०६ महसूली विभागातून १२ संस्थांना प्रत्येक रु.११.०० लक्ष या प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. सदर योजनेसाठी प्राप्त प्रस्तावामधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची / केंद्रांची निवड करण्यात येते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

    11/02/2025 22/02/2025 पहा (845 KB) डाउनलोड
    सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरीता अर्ज मागविणेबाबत

    समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन 2023-2024, या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरीता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरिता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी दि. 01 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. (उदा. सन 2023-2024 या वर्षाकरीता पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2023 ते 31 ‍डिसेंबर, 2023 असा विचारात घेण्यात येईल.

    01/02/2025 15/02/2025 पहा (139 KB) डाउनलोड