बंद

    होलार समाज आर्थिक विकास महामंडळ

    प्रस्तावना :-

    अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट तसेच राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रहिवाशी असलेल्या होलार समाजातील व्यक्तींकरिता संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वंयसिध्दी व्याज परतावा योजना) लाभ मिळून होलार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून होलार समाज आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) स्थापना दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर उपकंपनीचे कामकाज हे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल.

    अ) उपकंपनीची रचना (राज्यस्तर/जिल्हास्तर)
    उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहील.
    महामंडळाचे संचालक मंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व तीन शासकीय सदस्य राहतील :-

    1. शासन नियुक्त पदाधिकारी

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार  विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे अध्यक्ष

    अध्यक्ष
    2. शासन नियुक्त पदाधिकारी

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार  विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष

    उपाध्यक्ष
    3. मा. अपर मुख्य सचिव /मा.प्रधान सचिव/ मा.सचिव

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

    संचालक
    4. मा. सहसचिव /मा.उपसचिव

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

    संचालक
    5. व्यवस्थापकीय संचालक

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार  विकास महामंडळ मर्या., मुंबई

    संचालक तथा

    व्यवस्थापकीय  संचालक

    6. अशासकीय सदस्य – 3 संचालक

    ब) उपकंपनीचे कार्य:

    1. राज्यातील होलार समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
    2. होलार समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे.
    3. होलार समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
    4. होलार समाजासाठी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
    5. राज्यातील होलार समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.

    • या शासन निर्णयानुसार होलार समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्याबाबतची कार्यवाही प्रचलित कायदे व नियमानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत करण्यात येईल. सद्य:स्थितीत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार प्रवर्गासाठी ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या सर्व योजना होलार समाजासाठी स्वतंत्रपणे राबविल्या जातील.
    • सन 2024-25 या आर्थिक होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनी करिता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या भागभांडवली लेखाशिर्ष (4225-0042) मधून आवश्यक तरतूद मंजूर करण्यात येईल. उपकंपनीकरिता आवश्यक पदनिर्मिती (आकृतीबंध) व आर्थिक तरतूद याबाबत विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. तसेच मुख्य कंपनीच्या आस्थापनेवरील पदाच्या कार्यभार व निकषानुसार उपकंपनीतील मंजूर पदाकरिता कार्यभार व निकष लागू राहतील.
    • होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे सध्याच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या मुख्यालयांतर्गत राहील.
    • जिल्हा स्तरावरील कामकाजासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांच्या जिल्हा कार्यालयातील मंजूर अधिकारी/कर्मचाऱ्यांकडूनच उपकंपनीचे कामकाज करण्यात येईल.
    • सद्य:स्थितीत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक हे या उपकंपनीचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील. सद्य:स्थितीत होलार समाज आर्थिक विकास महामंडळाचे (उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे राहील.
    • वेबसाइट दुवा : https://lidcom.in/
    • दूरध्वनी : 022-22044186
    • ईमेल : md[at]lidcom[dot]in
    • पत्ता : ४५, वीर नरिमन मार्ग, बॉम्बे लाईफ बिल्डिंग, ५ वा मजला, फोर्ट, मुंबई - ४०० ००१