साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई
स्थापना
- महाराष्ट्र शासन समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एमपीसी-1084/ 1547/ (405) / एससीपी-01 मंत्रालय विस्तार भवन , मुंबई 400032, दिनांक 06 जुन, 1985 नुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ भारतीय कंपनी कायदा, 1956 खाली रू.2.50 कोटींच्या भागभांडवला सहीत नोंदणीकृत करण्यास मान्यता दिली आहे.
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना 11 जुलै, 1985 रोजी झालेली आहे.
उद्देश
- महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठयाप्रमाणात असलेला मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीं यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना राबवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
भाग भांडवल
- महामंडळ स्थापनेच्या वेळी मंजूर करण्यात आलेल्या भागभांडवली अंशदानाच्या रकमेमध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , शासन निर्णय क्र.एलएएस-2006/प्र.क्र.179/विघयो-2/ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-400032 दिनांक 20 डिसेंबर 2006 नुसार महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रू. 75.00 कोटी वाढविण्यात आले.
- शासन निर्णय क्र. एलएएस-2012/ प्र.क्र.422/ महामंडळे/ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई /दिनांक 26 जुन, 2013 नुसार महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रू. 300.00 कोटीपर्यंत वाढविण्यात आले आहे.
- सन 1985-86 ते 2018-19 महामंडळास रू. 39459.98 लाख भांडवल निधी प्राप्त झाला असून त्यामध्ये सन 1990-91 मध्ये केन्द्र शासनाकडून प्राप्त झालेल्या रू. 33.95 लाख रक्कमेचा समावेश आहे.
- महाराष्ट्र शासन व केन्द्र शासन यांचेकडून अनुक्रमे 51:49 टक्के प्रमाणात अधिकृत भागभांडवल मिळणे आवश्यक आहे. तथापि केन्द्र शासनाकडून अदयापपर्यंत 49% हिस्यापोटी रक्कम रू. 33.95 लाख मात्र प्राप्त झाले असून आज अखेरपर्यंत केन्द्र शासनाकडून रक्कम रू. 146.66 कोटी येणे प्रलंबित आहे.