संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित (लीडकॉम)
स्थापना
- १ मे, १९७४ रोजी कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असून अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी स्थापन झाले आहे.
- महामंडळाचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण उदयोग, उर्जा व कामगार विभागाकडे होते.महामंडळाचे सुरुवातीचे नाव महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ असे होते.
- शासन निर्णय क्र. चविम १०९५/ (६४६१)/उद्योग-५, दि.२४.६.१९९६ अन्वये महामंडळाचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
- शासनाच्या दि.२.१.२००३ च्या शासन निर्णयानुसार महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्यात आलेले आहे.
उद्दिष्टे
- राज्यात चर्मोद्योगाचा विकास, प्रोत्साहन व चालना देणे.
- चर्मोद्योगातील तंत्रज्ञान विकसीत करणे.
- चर्मवस्तूंसाठी बाजारपेठेची निर्मीती.
- चर्मकार समाजासाठी चर्मोद्योग व इतर व्यवसायासाठी विविध कर्ज योजना राबविणे व आर्थिक सहाय्य देणे.
- अनुसूचित जातीमधील चर्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे.
भाग भांडवल
- स्थापने वेळीचे भाग भांडवल रू.५ कोटी.
- अधिकृत भाग भांडवल रू. ७३.२१ कोटी.
- वितरीत भागभागवल ४३.२१ कोटी.
- शासनाकडून भागभांडवल व भागभांडवली अंशदान स्वरुपात एकुण रक्कम रू.३१४.६१ कोटी प्राप्त.
- अधिकृत भाग भांडवल रु.७३.२१ कोटी वरुन रु.१००० कोटी वाढविण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.