बंद

    अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई

    थोडक्यात इतिहास:

    • अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनूसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी, विभागाच्या शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, क्र. सीबीसी 10/2001/ प्र.क्र.144/ मावक-5, दि.1.8.2003 अन्वये, क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता.
    • या आयोगाने शासनास 82 शिफारशी केल्या होत्या. आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी शिफारस क्र. 72 येथे “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.” अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
    • सन 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये “डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येणार आहे” अशी घोषणा करण्यात आलेली आहे.
    • त्यानुषंगाने, मा.मंत्रिमंडळाच्या दि. 11.07.2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी,मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा ) या समाजाच्या विकासाकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात आली आहे.

    ध्येय व उद्दीष्टे:

    • संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.
    • विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली “सामाजिक समता” या विषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल या बाबत संशोधन करणे.
    • सामाजिक समता या विषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे.
    • समाजातील विविध स्तरामध्ये “सामाजिक समता” या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून “सामाजिक समता ” या कार्यास उचलून धरणे.
    • संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र , परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे.
    • संस्थेच्या उदिष्टांशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक, निबंध प्रकाशित करणे.
    • संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे तसेच त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.
    • शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिध्दी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडीत योजना राबविणे.
    • लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिध्दी करणे.
    • परंपरागत व्यवसायांना चालना देणे, आर्थिक मदत करणे.
    • कला, कौशल्य यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे व सहभागी होणे.
    • अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रसिध्द करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिध्द करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.
    • समाजाचे पुनःसरण उदिष्टानुसार परितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे.
    • दूरध्वनी : ---
    • पत्ता : बी-११०, अर्जुन सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई - ४०० ०८८.