महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

महामंडळा चा उद्देश

  • राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघुउदयोग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमांची आणि अन्य व्यवसाय (वैदयकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय यासारखे) व्यापार किंवा उदयोग यांची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.
  • इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उदयोग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधन सामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
  • इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ति किंवा संघटनांबरोबर करार करणे आणि त्यांच्याकडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देवून किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करुन, त्यांचेकडून कामे यथायोग्यरितीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
  • राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती ( ब्लु प्रिंटस) तयार करणे, तयार करुन घेणे आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.
  • वरील कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक वाटेल त्याप्रमाणे कंपन्या, संघ, सल्लागार मंडळे किंवा योग्य त्या संस्था प्रवर्तित करणे आणि स्थापन करणे.

ध्येय

  • राज्यातील इतर मागासवर्गीय पात्र व्यक्तींच्या सर्वांगिण आर्थिक व सामाजिक विकासासाठी अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.
  • राज्य महामंडळाच्या व राष्ट्रीय महामंडळाच्या योजना राबविणे, राज्य महामंडळाची 20% बीज भांडवल योजना बँकेमार्फत राबविणे तसेच रु.25,000/- ची थेट कर्ज योजना राबविणे.
  • राष्ट्रीय महामंडळाच्या महिला समृध्दी व स्वर्णिमा योजनेंतर्गत महिला लाभार्थींना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करुन देणे.
  • राष्ट्रीय महामंडळाच्या सुक्ष्म पत पुरवठा योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थेकडील बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन देणे.
  • महामंडळास चांगले समूह (cluster) उपलब्ध झाल्यास त्यांना प्रशिक्षण, अर्थ विषयक व बाजारपेठ इ. सेवा उपलब्ध करुन देणे.

मुदती कर्ज योजना

45% मार्जिन मनी योजना

स्वर्णिमा

महिला समृध्दी योजना

सुक्ष्म पत पुरवठा योजना

शैक्षणिक कर्ज योजना

20% बीज भांडवल योजना

रु.25,000/- पर्यंतची थेट कर्ज योजना

प्रशासकीय भवन,
4 था मजला, आर.सी.चेंबूरकर मार्ग,
चेंबूर, मुंबई – 400 071.
फोन नं. 2527 5374 / 2529 9685
फॅक्स नं. 2522 9219
वेबसाईट - www.msobcfdc.gov.in
ई-मेल - md@msobcfdc.gov.in
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे