बार्टी तर्फे दि. ०१ जानेवारी, २०२५ शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ कोरेगाव भिमा येथे अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे
भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी या दिवशी शौर्य दिनाचे संपूर्ण नियोजन बार्टीमार्फत केले जाते. यावर्षी संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत, याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत विजय स्तंभ शौर्य दिनानिमित्ताने संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकांच्या स्टॉल सोबतच संविधानाचे भव्य दालन विजय स्तंभाच्या मागील बाजूस बार्टीमार्फत उभारण्यात येणार आहे. यामध्ये संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी, संविधान सभेतील दुर्मिळ छायाचित्रे, संविधानावर तयार केलेल्या चित्रफिती, अशा स्वरूपात या कला दालनामध्ये संविधानाची महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांनी संविधानाबद्दल आपले मत, प्रतिक्रिया नोंदविण्याची सोय या दालनामध्ये आहे. पुस्तक स्टॉलवर अल्पदरात वाचकांना महापुरुषांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.