संक्षिप्त इतिहास

समाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्वेतिहास

1928
November 5, 1928

शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना.

1930
1930

सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर

1932
1932

मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक

1947
1947

1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.

1947
August 9, 1947

मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 9.8.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

1957
September 23, 1957

शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. - 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना.

1972
March 1972

समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली.

1983
1983

समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.

1993
April 1993

एप्रिल,1993 मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.

1999
March 1999

मार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.

2001
February 2001

फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले

समाज कल्याण विभाग - काही स्थित्यंतरे

1932
1932

सन 1932 मध्ये बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना

1957
1957

सन 1957 मध्ये पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना ( समाज कल्याण, महिला व बाल विकास , आ दिवासी विकास , विजाभज, इमाव व अपंग कल्याण विभाग एकत्रित )

1982
1982

सन 1982 मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र

1991
1991

सन 1991 मध्ये महिला व बाल विकास विभाग स्वतंत्र

2000
2000

सन २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती

2001
2001

सन 2001 मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची निर्मिती

शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे