चांगले काम करणाऱ्या वसतिगृहाचा आदर्श घ्यावा – मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील २५० क्षमतेच्या मुलींचे शासकीय वसतिगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक असल्याचे सांगून चांगले काम करणाऱ्या वसतिगृहांचा राज्यातील इतर वसतिगृहांनी आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले.