हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे, २०१३
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३
- उपरोक्त अधिनियमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय दिनांक ७.८.२०१५ अन्वये विविध निर्देश जारी करण्यात आलेले आहेत.
- तसेच सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत नोडल अधिकारी म्हणुन आयुक्त, समाजकल्याण यांना घोषित करण्यात आलेले आहे.
- तद्नंतर सदर अधिनियमाच्या व नियमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामीण तथा शहरी भागात विभागाच्या शासन निर्णय दिनांक ११.६.२०१९ अन्वये सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत.
- त्याचबरोबर संबंधीत कायदा त्याचबरोबर मा. सर्वौच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.५८३/२००३ मध्ये दिनांक २७.३.२०१४ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विशेष व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे.
- दिनांक ३१ जुलै,२०१९ च्या अधिसूचनेन्वये मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर संनियंत्रण समीतीचे गठन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर संबंधीत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, समन्वय व देखरेख करण्यासाठी जिल्हास्तर व उपविभागीय स्तरावर दक्षता समीतीचे देखील गठन करण्यात आलेले आहे.
- हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ (464 केबी)
- हाताने मैला उचलणा-या घटनांची व त्या संबधित इतर बाबींची तक्रार नोंदविण्यासाठी अर्ज
हाताने मैला उचलण्या बाबत असलेल्या तक्रारीं विभागाच्या खालील सामाजिक माध्यमांद्वारे निदर्शनास आणून देऊ शकता: