बंद

    बीजभांडवल योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    योजनेची संक्षिप्त माहिती:

    • महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलातून भांडवली अंशदानाच्या स्वरुपात शासनाकडून प्राप्त होणा-या निधीचा वापर बीजभांडवल योजना राबविण्यासाठी करण्यात येतो.
    • शहरी व ग्रामिण भागासाठी उत्पन्न मर्यादा रक्कम रू. 3,00,000/-असणा-या कुटूंबाना रु.50,001/-ते रु. 7,00,000/- पर्यतच्या गुंतवणूक असलेल्या वैयक्तिक प्रकल्पास मंजूरी देण्‍यात येते.
    • मंजूर कर्ज प्रकरणांत गुंतवणूकीच्या प्रमाणात महामंडळाकडून 20% सहभाग (रु.10000/- अनुदानासह) बीजभांडवल कर्जरुपात 4% व्याजदराने मंजूर करण्‍यात येते आणि 75% भाग हा बॅकेचा व उर्वरीत 5% सहभाग लाभार्थ्यांचा असतो.
    • तसेच एनएसएफडीसी दिल्ली यांचेकडून मंजुर होणाऱ्या कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाच्या बीजभांडवल योजनेच्या सुमारे 20% कर्ज रक्कमाचा हिस्सा भागभांडवलाच्या निधीतून बीजभांडवल कर्ज म्हणुन लाभार्थीस वितरीत केला जातो.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.