माध्यमिक शाळेतील ५ वी ते १० वी तील विदयार्थ्याना शिष्यवृत्ती
योजनेच्या प्रमुख अटी
- मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील इ. 5 वी ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा.
- ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत-कमी 50% व त्याहून अधिक गुण मिळवूण मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधुन प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल.
- या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नाही.
- ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नसते.
लाभार्थी:
अनुसूचित जाती
फायदे:
इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये प्रमाणे (500 रुपये 10 महीन्यासाठी) आणि इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये प्रमाणे (1000 रुपये 10 महीन्यासाठी)
अर्ज कसा करावा
संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्याची यादी तयार करुन संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे कडे सादर करतील