बंद

    परिचय

    महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील लोकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. हे विभाग अनुसूचित जाती, वृद्ध व्यक्ती, तृतीयपंथीय समुदाय आणि समाजातील इतर दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. याविभागातर्फे शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, रोजगार निर्मिती, गृहनिर्माण इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

    समाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्वेतिहास

    • नोव्हेंबर ५, १९२८ :- शासन निर्णय क्रमांक ४३७०, दिनांक ५ नोव्हेंबर १९२८ अन्वये स्टार्ट समितीची स्थापना.
    • १९३० :- सदर समितीमध्ये एकूण १० सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल १९३० साली शासनास सादर
    • १९३२ :- मागास समाजासाठी १९३२ साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक
    • १९४७ :- १९४७ साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.
    • ऑगस्ट ९, १९४७ :- मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक ९.८.१९४७ रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
    • सप्टेंबर २३, १९५७ :-शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. – २८५७ डी, दिनांक २३ सप्टेंबर १९५७ अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना.
    • मार्च १९७२ :-समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च १९७२ मध्ये झाली.
    • १९८३ :-समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन १९८३ मध्ये करण्यात आले.
    • एप्रिल १९९३ :-एप्रिल,१९९३ मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.
    • मार्च १९९९ :-मार्च, १९९९ मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.
    • फेब्रुवारी २००१ :-फेब्रुवारी २००१ मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले

    समाज कल्याण विभाग – काही स्थित्यंतरे

    • १९३२ :- बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना
    • १९५७ :- पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना (समाज कल्याण, महिला व बाल विकास, आदिवासी विकास, विजाभज, इमाव व अपंग कल्याण विभाग एकत्रित)
    • १९७८ :- महात्मा फुले मागसवर्ग विकास महामंडळची स्थापना
    • १९८२ :- आदिवासी विकास विभाग स्वतंत्र
    • १९८५ :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळची स्थापना
    • १९८५ :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळची स्थापना
    • १९९१ :- महिला व बाल विकास विभाग स्वतंत्र
    • २००० :- अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती
    • २००१ :- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची निर्मिती.
    • २००८ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ची स्थापना
    • २०१७ :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाले
    • २०१९ :- लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना
    • २०२१ :- महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) ची स्थापना
    • २०२२ :- दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र झाले
    • २०२४ :- अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना
    • २०२४ :- ज्येष्ठ नागरीक महामंडळाची स्थापना
    • २०२४ :- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना (महात्मा फुले मागसवर्ग विकास महामंडळ यांच्या अंतर्गत)
    • २०२४ :- होलार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या अंतर्गत)